अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यांच्या या नव्या सरकारला महिना उलटून चालला आहे, तरी अद्याप त्यांचे खातेवाटप झाले नाही की मंत्रीमंडळ विस्तार.

त्यावरुन आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यावर टीका करत शिंदे सरकारची खिल्ली उडविली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सराकारच्या कॅबिनेटमध्ये हे दोघे बसून चर्चा करत असतात. बाकीच्या 45 खुर्च्या यांच्याकडे बघत असतात, हे दोघं काय करता काय नाही, असे पवार म्हणाले.

अजित पवार आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध समस्यांवर भाष्य करत शिंदे सरकारला धारेवर धरले. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी तातडीची मदत करण्याची मागणी सरकारकडे केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) कोणतीही कामे झाली नाहीत, असे शिंदे सरकारचे मत आहे, पत्रकारांच्या या  प्रश्नाला थांबवत, तुम्ही गडबड करु नका असे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ग्रामीण भागांत कामे झाल्याचे म्हटले आहे, असे पवारांनी सांगितले.

अजित पवारांनी शिंदे सरकारवर केलेल्या उपहासात्मक टीकेवर त्यांना स्वत:लाच हसू आले. त्यांनी स्वत: टाळी वाजविली. पुढे पवार म्हणाले, त्याच्यामुळे त्यांच्यावर एवढं टेन्शन असतं खाली खुर्च्यांचं. आपण चुकू नये बरं का दोघं चुकू नये.. असे ते एकमेकाला सांगत असतात.

एकनाथ शिंदे यांनी शहरात आणि ग्रामीण भागांत कामे झाली नाही, असे आरोप केले आहेत. मुळात गेली अडीच वर्षे ते स्वत:च नगरविकास मंत्री होते. त्यामुळे त्यांनी आपण अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होणार, तर चार कामे करायला हवी होती, असे म्हणत त्यांनी शिंदे यांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या –

‘त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये’; शिंदेंची न्यायालयाला विनंती

नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

“भाजपमध्ये गेलेल्यांवर ईडीची कारवाई झालेली दाखवा आणि लाख रुपये मिळवा”

“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”