“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”

पुणे : मोदी सरकारने घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम 370 बाबतच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तुफान नाच करत जल्लोष साजरा केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी निशाणा साधला आहे. 

नाशिकमध्ये पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात. ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्रीमहोदय… तुम्ही पाण्याचं पाहावं, असा खोचक टोला अजित पवारांनी महाजनांना लगावला आहे. गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्रीही आहेत. 

राज्यात सेना-भाजपच्या यात्रा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचीही शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. यावेळी राज्यातील पूर परिस्थितीवर बोलताना अजित पवारांनी महाजनांवर टीकेची झोड उठवली आहे. 

पाणी पाहिल्यावर माणसाला समजत नाही काय करावं. लोक अडचणीत आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. जनता पूरात आहे आणि मुख्यमंत्री प्रचारात… यात्रा महत्वाची की महाराष्ट्रातील माणूस???, असा सवालही यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला पाहिजे. सगळे पालकमंत्री जिल्ह्यात जाऊन बसले पाहिजेत. यंत्रणा कामाला लावली पाहिजे, अशी अजित पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”

-काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी

-भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!

-…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका

-अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ