पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

पुणे | राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचं मोठा वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्राला सहकाराची समृद्ध भूमी असं म्हटलं जातं. सध्या राज्यात जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे.

राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर सातत्यानं वर्चस्व ठेवलं होतं.

आत्ताच हाती आलेल्या निकालानूसार पुणे जिल्हा बॅंकेच्या 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलनं विजय मिळवला आहे. परिणामी परत एकदा अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व कायम राखलं आहे.

एकूण 21 पैकी 14 जागा या बिनविरोध निवडण्यात आल्या होत्या. उर्वरित 7 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीनं 6 जागांवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादीला सर्वच म्हणजेच 7 जागा जिंकण्याचा विश्वास होता पण एका जागेवर भाजपनं विजय मिळवला आहे. परिणामी सध्या याच निर्णयाची चर्चा आहे.

अजित पवार आणि पवार कुटुंबाचा गड असणाऱ्या बारामतीतून तब्बल 52 मतं फुटली आहेत. याचा थेट फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला आहे. यावर अजित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. मला जिथं डाऊट होता तिथंच मत 11 मत कमी पडले, असं पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी भरसभेत प्रदिप कंद यांच्यावर जोरदार टीका केली होती. प्रदिप कंद यांना मतदारांनी जागा दाखवण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. पण नेमकं याच जागेवर राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला आहे.

अजित पवार हे 1991 पासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालक आहेत. त्यांनी तब्बल 7 वेळा अध्यक्षपद भूषवलं आहे. अजित पवार यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपनं देखील राष्ट्रवादीच्या गडाला हादरा देण्याचा भरपूर प्रयत्न केला. विजय मिळवून देखील बारामतीतून फुटलेल्या मतांबाबत राष्ट्रवादी चिंतेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही

नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

अनिल परब केंद्राच्या रडावर, लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई