विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना दणका; कोर्टाच्या आदेशानंतर इतर दिग्गज नेत्यांवरही गुन्हे दाखल

मुंबई |  महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर विधानसभेच्या तोंडावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आज अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, नुकतेच भाजपवासी झालेले विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांच्यावर झालेल्या कारवाईने राष्ट्रवादी आता बॅकफूटला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असं म्हणत अजित पवार यांनी झालेले आरोप धुडकावून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-