मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन महिना लोटला तरी त्यांचा मंंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. ऑगस्ट क्रांती दिनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या गटाने शपथ घेतली खरी पण अद्याप खातेवाटप झाले नाही.
त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पुण्यात ते पत्रकारांसोबत बोलत असताना शिंदे यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. हे नवीन सरकार किती काळ टीकेल यावर देखील त्यांनी भाष्य केले.
साताऱ्यात आपल्या मूळ गावी केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले होते की, बंडाच्यावेळी थोडा जरी दगाफटका झाला असता, तर मी शहीद झालो असतो. त्यावर अजित पवारांनी भाष्य केले.
त्यांच्या मनात शहीद होण्याची भिती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते, ते आता मी कसे सांगावे? पण राज्याच्या जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही, असे पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे गट मुंबईत जनतेच्या प्रश्नांसाठी एक मध्यवर्ती कार्यालय बांधणार आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या गटाच्या मुंबईतील पहिल्या शाखेचे मानखुर्द (Mankhurd) येथे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावर पवार म्हणाले, कोणी कुठे कार्यालय बांधावे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचा वाद न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर आहे. पण कार्यालय काढल्यावर तिथे लोक यायला पाहिजेत ना!
लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. गेला महिनाभर लोक फो़डाफोडीचे राजकारण बघत आहेत. यांनी वैयक्तित स्वार्थासाठी फोडाफोडी केली, की जनतेसाठी केली, हे लोकांना माहित असल्याचे पवार म्हणाले.
सरकार कोसळण्यावर पवार म्हणाले, कोणतेही सरकार आले तरी, सरकार टिकविण्याचा जादूई आकडा 145 हा तुमच्याकडे ठेवू शकता तोपर्यंत सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा सांभळला जाणार नाही, त्यादिवशी हे सरकार कोसळेल.
महत्वाच्या बातम्या –
शिंदे गटाची पहिली शाखा उघडली, खासदारांच्या हस्ते उद्घाटन
प्रति शिवसेनाभवन बांधण्यावरुन उदय सामंतांचे स्पष्टीकरण
शिंदे आणि फडणवीस यांनी एक शब्द फेमस केला आहे, तो म्हणजे… – अजित पवार
आमच्याकडे पोलीस भाड्याने मिळतील, पोलीस स्टेशन सुद्धा बूक करु शकता