पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!

पुणे |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा अजित पवार यांनी घेतला. यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन कोरोनाची सद्यपरिस्थिती आणि शासनाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. यावेळी एका पत्रकाराने पार्थ पवार सिंगापूरहून सुखरूप आले का? असा प्रश्न विचारताच अजित पवारांनी चिडून ‘दादा’ शैलीत उत्तर दिलं.

तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही, असं ते म्हणाले. पत्रकाराने अजून त्यांना त्याच विषयावर प्रश्न विचारण्यासा प्रयत्न केला. मग मात्र चिडून अरे मी त्याचा बाप सांगतोय ना… आणखी काय पाहिजे मग…. असं उत्तर दिलं.

दरम्यान, पुण्यात पत्रकार परिषदेत कोरोनाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे. गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे. लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या – 

-राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस

-मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका- इंदोरीकर महाराज

-मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय

-तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर परस्थिती बिघडू शकते- तुकाराम मुंढे

-कोरोना व्हायरसमुळे हस्तांदोलन टाळा, नमस्कार करा; शरद पवारांचा सल्ला