‘उगाच सारखं बारामतीच्या नावानं ओरडू नका’; अजित पवार संतापले

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी पुण्यातील विमानतळ कोणत्याही परिस्थित बारामतीला हलवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

चाकण एमआयडीसी हद्दीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यातील विमानतळ बारामतीला नेलं जाणार नाही. त्यामुळं उगाच सारखं बारामती, बारामती असं ओरडू नका, असं अजित पवार म्हणालेत.

मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं. अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी येणारे उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लगेच परतावं लागतं. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणं गरजेचं आहे, असं ते म्हणालेत.

मुंबई, नवी मुंबई, मावळ, थोडी खेड, हडपसर, पुरंदर, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेनची आखणी केंद्र सरकार करत आहे. यात खूप कमी थांबे असणार आहेत. दळणवळणच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आमची तयारी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

नाट्यमंदिर विकसित करण्याचा हा निर्णय महापालिकेत सत्तेत असताना भाजपने घेतला आहे. मी बातम्यांमध्येच हे वाचलं. मला याबाबत जास्त काही माहिती नाही, मला फक्त प्रेझेंटेशन दिलं गेलं. महत्वाच्या कलाकारांच्या कमिटीसमोरच झालेला हा निर्णय आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा 

खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ! 

‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन 

पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं