“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत”

मुंबई |  देशात सध्या कोरोना रोगाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. तरीदेखील कोरोनाची परिस्थीती आटोक्यात न येता आणखीनच बिघडत चालली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना बेड्स आणि इतर सुविधा कमी पडत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यात घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यास तातडीने लॉकडाऊन जाहीर करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. अशातच भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी याचमुद्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार विसरलेत की ते नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नसून अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राला लॉकडाऊन परवडणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. कोरोना हाताळण्याची सिस्टिम दर्जेदार करा पण नोकरी धंद्याचे नुकसान होता कामा नये. तसेच महाराष्ट्राची वाट लावू नका, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर खूप ताण येऊन ते सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होऊ शकत नाही. ही सगळी परिस्थीती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी निर्देशनास आणून दिली.

रविवारी 28 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निर्बंध आणि नियमांचे पालन होत नाही. यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती.

त्यामध्ये खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये आणि समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सूचना प्रशासनास देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अर्थचक्रही प्रभावीत होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल, असं सीताराम कुंटे सांगितलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

खळबळजनक! पुण्यात भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागून…

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंधांचे पालन होत…

खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

महिलेचा भररस्त्यात धिंगाणा! म्हणतेय, ‘म.र्डर करून एका…

स्टंट करायला गेला पण चांगलाच अंगलट आला, चालू बाईकवर उभं…