सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट!

नागपुर | महाविकास आघाडीची सत्ता येताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्या विरूध्द कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

नव्या सरकारमध्ये अजित पवारांच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आधीच्या सरकारमध्ये असताना लागलेले सिंचन घोटाळ्याचे डाग धुतले गेल्याचं दिसत आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 57 कलमी प्रश्नावली दिली असून त्यांनी 52 प्रश्नांची उत्तरे सादर केला होती. मात्र  त्याचौकशीत अजित पवार कोठेही दोषी आढळून आलेले नाहीत, असं 27 नोव्हेंबरच्या शपथपत्रात स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-