सगळे सोडले अन् मलाच का पकडलं?? अजित पवार संतापले

परळी | राज्याच्या सहकारी बँकेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे जे आदेश न्यायालनाने दिलेत, त्यामध्ये भाजप-सेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. मात्र माध्यमांना फक्त मीच दिसतो, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परळीत बोलत होते. 

मी एका पैश्याचाही मिंदा नाही. पण बाकी 74 लोकांचं सोडून फक्त माझंच नाव घेतलं जातं, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्यावर केले जाणारे आरोप धु़डकावून लावलेत. 

कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, पंचाहत्तर लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-