चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुंबई | राज्य सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवलं आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

घरांची पडझड झाली त्यांना आता 95 हजार दिले जात आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांना 15 हजार रुपये, झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय.

मागील वर्षीच्या पुरात झालेल्या काही नुकसानग्रस्तांना अद्यापही त्यांची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या नुकसानग्रस्ताचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तात्काळ पैसे दिले जातील, असं अजित पवारांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?- देवेंद्र फडणवीस

-गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

-कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन

 

-‘…पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं’; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला

-निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार