अजित पवारांना मिळणार ‘हे’ मंत्रिपद?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्याची मागणी कार्यकर्ते करत होते. मात्र अजित पवारांकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

साखर कारखाने 25 तारखेपासून सुरु झाले आहेत, मात्र काही कारखान्यांच्या अडचणी आहेत, हार्वेस्टिंग आणि इतर काही समस्या असल्यामुळे त्यासाठी निधीची गरज आहे. या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे, असं मत अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.

सहकार विभाग आणि साखर आयुक्त विभागाला एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोड झाली पाहिजे, कारखाने बंद पडू नयेत, कारण रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिकेचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-