…म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला- गिरीश महाजन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार अज्ञातवासात आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पवारांच्या घरातील कौटुंबिक कलहामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असेल, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने भाजपलाही धक्का बसला आहे. याबाबत त्यांच्या घरातील लोकांनाही माहिती नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत. 

अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला आहे. आपण आमदारकीचा राजीनामा देत आहोत, आणि त्याचा स्वीकार करावा, अशा एका ओळीत अजित पवारांनी हा राजीनामा दिली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ई – मेल द्वारे अजित पवारांनी राजीनाम्याची प्रत पाठवली आहे. बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

 महत्वाच्या बातम्या-