बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार पोहचले शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई | बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार तातडीने सिल्व्हर ओकवर रवाना झाले होते.

दरम्यान, अजित पवार ही त्यांच्या निवासस्थानाहून सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाले होते.

महत्वाच्या बातम्या-