नवी दिल्ली | आज विधान परिषदेत महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, ‘दरेकर साहब को गुस्सा क्यु आता है’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दरेकरांची खिल्ली उडवली.
मुबंई बँकेत घोटाळे केलेल्यांना तुरुंगात टाका. पेन ड्राइव्ह असे किती तरी आम्ही देऊ शकतो. विनोद तावडे यांनी हा भ्रष्टाचार बाहेर आणला होता. EWO कडे ही तक्रार गेली आहे, असा आरोपच मनीषा कायंदे यांनी केला.
प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेत विश्वासघात केल्याचे अहवालात आले आहे. बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज आहे. प्रवीण दरेकर यांना सभागृहातून अपात्र का केलं जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
विरोधीपक्ष नेत्यांचे नाव घेतांना नोटीस द्यायला हवी. माझ्याकडे महाराष्ट्रातील नेत्यांची नावे आहेत. आम्ही काही केलं असेल तर जाऊ आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, असं उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिली.
अजित पवार यांनी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांची बाजू घेत प्रविण दरेकरांना सभागृहात टोला लगावला.
दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है. मी नितीन गडकरी,विनोद तावडे यांना सभागृहात काम केलेलं पाहिलं आहे. सहकारी कारखाण्यात दरोडे घातल्याचं बोललं जात आहे, असं म्हणत त्यांनी दरेकरांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या-
मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू
“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा”
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!
‘गरज सरो, वैद्य मरो’; संजय राऊत मोदी सरकारवर बरसले
“पंडित नेहरुंच्या त्या चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”