पुणे महाराष्ट्र

खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!

पिंपरी : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मोठी जबाबदारी टाकणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरीत यासंदर्भात सुतोवाच केले.

लोकसभा निवडणूक झाल्यापासून अमोल कोल्हे भोसरीत आले नसल्याची तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. यावेळी अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

आमदार-खासदार झाल्यावर दारोदारी जाऊन फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगलं काम करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांचे, बैलगाड्याचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले आहेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे, असं ते म्हणाले.

आगामी काळात अमोल कोल्हे यांना शरद पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राज्यभर फिरायचे आहे. त्यामुळे त्यांना फक्त शिरुरपुरते मर्यादित करु नका, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांना भोसरीत मताधिक्य मिळू शकले नाही. त्यांना २८ हजार मतांची पिछाडी आहे, त्यामुळे त्यांना भोसरीत कसं यावंसं वाटेल, असा टोला देखील त्यांनी यावेळी तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

-…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

-कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

-अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

-“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

 

IMPIMP