मुंबई | सांगली जिल्ह्यात (Sangli) रोहित पाटील(Rohit Pawar) कवठेमहांकाळ नगरपंचायत (Kavathe Mahankal Election) निवडणुकीत प्रचार करत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.
कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की 25 वर्षांच्या तरुणा विरोधात सगळे एकत्र आले आहेत.
राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि आबांचं कुटुंबीय हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे, असं रोहित पाटलांनी सांगितलं आहे.
येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
रोहित पाटलांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पाटील यांच्याविरोधात चाललेल्या राजकारणाविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
प्रांत अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मीही रोहितला फोन करून विचारेन. रोहित गेल्याच आठवड्यात मला भेटला होता. पण असं कोण कुणाला एकटं पाडेल असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
रोहितची कामाची पद्धत चांगली आहे. मी त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला काय मदत पाहिजे ती देण्याचं काम करेन, अजित पवार यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा
“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत”
‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले…
अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!