बँक घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांवर अजित पवार म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील इतर नेत्यांचीही नावं चर्चेत आली. या सगळ्या आरोपांबद्दल शिवस्वराज्य यात्रेत अजित पवरांनी भाष्य केलं आहे.

मीडिया फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढं प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही हे जाहीर भाषणात सांगतो, असं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पंचाहत्तर लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-