105 आमदारांचं तुणतुणं वाजवणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं खास उत्तर!

नाशिक |  भाजपचे 105 आमदार असूनही शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापन केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून अनेकदा शाब्दिक हल्ला चढवला. मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाच्या बाहेर आहे अन् 40 टक्क्यावाल्या 3 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली आहे, असं अनेकदा फडणवीसांनी बोलूनही दाखवलं. यावर फडणवीसांचे तीन दिवसांचे सोबती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

अधिक गुण घेणारा विद्यार्थी व्यवहारात हुशार असतोच असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. नाशिकची विभागीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांच्या शल्ल्यावर अलगद बोट ठेवत चिमटा काढला अन् उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. परंतू मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न उराशी बाळगलेली शिवसेना अखेरपर्यंत आपल्या मतावर ठाम राहिली अन् काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आपला संसार थाटला. यादरम्यान अजित पवार यांनी राजकीय बंड करून भूकंप केला परंतू त्या भूकंपाने भाजपला काहीच फायदा झाला नाही. अजित पवारांचं बंड 3 दिवसांत थंड झालं.

दरम्यान, आता अजित पवार यांच्या टोल्याला आता फडणवीस कश्या प्रकारे आणि काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही; हिंदू महासभेचा अजब दावा

-बजेटवर टीका करताना राहुल गांधींना आठवला मोदींचा व्यायाम! म्हणाले…

-न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत जाऊन भारताने लोळवलं! ऐतिहासिक व्हाईटवॉश….

-काँग्रेस राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना हैरान केल्यानंच ते सुट्टीवर गेलेत- नितेश राणे

-तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात; भाजपच्या बबन लोणीकरांचं धक्कादायक वक्तव्य