उद्या मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट सरकारचा गेला महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडिंना वेग आला आहे. गेला महिनाभर संपूर्ण राज्य आणि आमदार या क्षणाची वाट पाहत होते.

या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यावेळी भाजपच्या 4 आणि शिंदे गटाच्या 5 आमदारांच्या नावाची चर्चा आहे. या संदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे, असे मला वाटते. पण अद्याप मला तशा स्वरुपाची कोणतीही माहिती अधिकृतपणे मिळाली नाही. असे अजित पवार म्हणाले आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते या अधिकारात मला आज एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता विरोधी पक्षांची नावे देण्यासाठी ते पत्र मला प्राप्त झाले आहे, असे पवार म्हणाले आहेत.

विविध माध्यमांच्या वाहिनीवरुन उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. परंतु राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधारी पक्षाकडून मला काहीही सूचित करण्यात आले नसल्याचे पवार म्हणाले.

अजित पवार यांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी वेळोवेळी त्यांचा पिच्छा पुरवला होता. राज्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यांना पालकमंत्री तातडिने नेमण्याचे त्यांनी शिंदे यांना सुचित केले होते.

जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यांच्या व्यथा आणि नागरिकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचत नसल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराने लवकरच जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाविषयी शरद पोंक्षे यांचं मोठं वक्तव्य!

‘यांच्या बापजाद्याने कधी 50 कोटी पाहिले नसतील’; खडसे बंडखोरांवर बरसले

“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत