शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई |  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘शिवसृष्टी’ थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सदर कामाचा आराखडा उभारण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

याखेरीज महाराजांच्या काळापासून ते सद्यस्थितीतला आधुनिक महाराष्ट्र कशा पध्द्तीनं घडला, याविषयीची माहिती देणारं म्युझिअम उभारलं जाईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. ट्विट करुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

परदेशात उभारल्या जाणाऱ्या टाऊन हॉलच्या धर्तीवर बारामतीतल्या तीन हत्ती चौकाचा विकास करण्याचे निर्देश दिले. याची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद पी.के. दास यांच्याकडे सोपवण्यात आली. यासंदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करण्यास सांगितले. यासह कॅनल सुशोभीकरणाच्या सूचना केल्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-शंकररावांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप विलासराव देशमुखांनी केलं होतं- अशोक चव्हाण

-पवारसाहेबांकडे पाहिल्यावर वाटतं… यांच्यासारखं काम करता यायला पाहिजे- अशोक चव्हाण

-“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”

-कन्हैया कुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला!

-…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!