मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. अशावेळी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत अजित पवारांकडे चार्ज देण्याची मागणी केली जात होती. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला.
गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका केली होती. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना तसेच भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
मुख्यमंत्री येणार होते, पण आम्ही नको सांगितलं. मुख्यमंत्री वर्षावरून कामकाज पाहत होते. बाकीच्यांनी काळजी करायची गरज नाही. मुख्यमंत्री पदाचा पदभार कोणाकडे द्यावा, असं जरी कोणी बोलत असतील तर बाकीच्यांनी यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.
राज्य कशा पद्धतीने चालवायचं असतं आम्हालाही कळतं. मी 30 वर्ष काम करतोय, बाळासाहेब 35 वर्षे काम करत आहेत. कोणी विधानपरिषदेचा सदस्य बोलतो की 4 दिवसात राज्य विकतील, राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं, असं अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं आहे.
दोन तीन दिवसांत आम्ही मुख्यमंत्र्यां सोबत बसत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चा करुन राज्यपालांची भेट घेऊ. ज्यांच्याकडे बहुमत असते असे सरकार बरखास्त होत नसते, सरकार बरखास्त कारण्यासाठी काही नियम असतात, विधेयक मंजूर होऊ नये, असे विरोधकांना वाटत होते म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
आमची सर्वांचीच इच्छा होती की मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं. चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा मी केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत, असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”
“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील”
काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर