“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर

मुंबई | विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेनेचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर भाष्य केले.

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आज (दि. 16) आगामी पावसाळा अधिवेशनाच्या अगोदर एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर सर्व विरोधी पक्षांनी सामुहीक बहिष्कार टाकला. त्यांनी चहापाणी बैठकीला जाण्यावर बहिष्कार टाकला.

ज्याप्रकारे शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे, ते लोकशाही आणि संसदीय प्रणालीला धुडकावत स्थापन झाले आहे. त्यांच्या सरकारवर सर्वोच्च न्यायालयात टांगती तलवार आहे. तरी ते सरकार चालवत आहेत, असे पवार म्हणाले.

राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली असल्याने त्या जिल्ह्यांना तातडीने मदत करायला हवी, अशी मागणी पवारांनी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, 75 हजार हेक्टरी मदत आणि बागायतीसाठी 1,50,000 मदत जाहीर करावी, पावसाच्या तडाक्यात आलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागण्या पवारांनी केल्या.

सत्ताधारी पक्ष हवे ते विषय सोडून नको ते विषय पुढे आणत आहे. महागाई, अतिवृष्टी आणि इतर मुद्दे सोडून ते वंदे मातरम् हा नवा मुद्दा घेऊन आले. वंदे मातरम् ला आमचा विरोध नाही, पण तो आताच का आणला गेला, असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.

सत्तेतील काही आमदार महाराष्ट्रात दंगल आणि संघर्ष पेटविण्याची वक्तव्ये करत आहे. फोडा, मारा ही त्यांची भाषा आहे. यावेळी त्यांनी संतोष बांगर (Santosh Bangar)यांच्या मारहाणीचा देखील समाचार घेतला. सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?, असा प्रश्न अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना विचारला आहे.

राज्यातील बऱ्यापैकी धरणे पूर्ण भरली आहेत. त्यांचे योग्य नियोजन केले पाहिजे. नदीकाठच्या गावांना त्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने आतापासूनच कामे केली पाहिजेत, असे पवारांनी म्हंटले आहे.

आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी लेखणी चालवून मतपरिवर्तन करण्याचे काम केले होते. तसेच आता करण्याची वेळ आली आहे. सत्ता शिंदे आणि भाजपच्या डोक्यात गेली आहे. त्यांच्याविरोधात पत्रकारांनी लेखण केले पाहिजे आणि लोकांपर्यंत हे पोहोचविले पहिजे.

महत्वाच्या बातम्या – 

“700 रुपये नुकसान भरपाई देतो, असे सांगून आघाडी सरकारने…” – देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ

काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाब एन. व्हि. रमणांचा महत्वपूर्ण निर्णय

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये असंतोष? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…