मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेऊन आता महिना लोटला तरी त्यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहे. आता अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारवर निशाणा साधलाय.
गेले अनेक दिवस आम्ही मुख्यमंत्र्यांना खातेवाटप करा, जिल्ह्यांना पालकमंत्री नेमा अशा मागण्या करत आहोत, पण मुख्यमंत्री लवकरच, लवकरच यापुढे काही बोलत नाही, असे अजित पवार एका सभेत म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार (MVA) असताना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचे निर्णय महाराष्ट्रात व्हायचे. महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीत होत नाही. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा तसा रिवाज नाही. पण तो कुठेतरी बाजूला सारला गेल्याचे चित्र दिसत असल्याचे पवार म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री यांना पत्रकारांनी खातेवाटपाबाबत विचारले असता, आम्ही दोघे आहोत ना, असे त्यांचे उत्तर असते. या दोघांना सर्व पाहता येत आहे का? आता महाविद्यालयात प्रवेशाचा काळ सुरु आहे, राज्यात शिक्षण मंत्री नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार?. तुम्ही याचे आत्मपरिक्षण करा, असंही पवार म्हणालेत.
याचसोबत मुख्यमंत्र्यांकडून कायद्याचे पालन होत नाही. पुणे दौऱ्यात ते रात्री 12 वाजता रुग्णालयात समाजसेवक प्रकाश आमटे (Prakash Amte) यांच्या भेटीसाठी गेले. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. हे रुग्णालयाच्या आवारात करणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असताना शिस्तीने वागायचे, पण आता वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. त्यांनी दिल्लीवारी केल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेत नाहीत, असा टोला पवारांनी शिंदे यांंना लगावला.
राज्यात पालकमंत्री आणि खात्यांना मंत्री नसल्याने लाोकांचे प्रश्न दावणीला बांधले गेले आहेत. त्यांनी त्यांचे अधिकार सचिवांंना दिले आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अधिकार द्यायचे नाहीत, मंत्री करायचे नाही, असे का? याबाबत शिंदे यांनी मला उत्तर द्यावे, असेही पवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या –
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
बिग बॉस मराठी 4 होस्ट करण्याबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा!
मोठी बातमी! संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
“अमित शहांमध्ये मला सरदार वल्लभभाई पटेलांचं प्रतिबिंब दिसतं”