मुंबई | प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते.
या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सदा सरवणकर यांच्याविरोधात दादर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
तसेच शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी गेल्या अनेक दिवसांत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तसेच वेदांता फॉक्सकॉनवरुन (Vedanta Foxconn) देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना झापले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) बीड जिल्ह्यात एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अतीवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे अद्याप मिळत नाहीत. ते अगोदर द्या, असे अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले.
सत्तेची मस्ती, नशा आणि धुंदी उतरविण्याची ताकद महाराष्ट्रायच्या जनतेमध्ये आहे. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असे पवार म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याबद्दल देखील भाष्य केले.
15 जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली. आणि आता म्हणाताय मागच्या सरकारने केले. खोक्याने सर्व गोष्टी साधता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
तसेच गेला महिना कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार लोकांवर गोळीबार करतात, मग सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असे अजित पवार म्हणाले.
विरोधकांचे हात पाय तो़डा आणि कोणी काही बोलले तर मी तुमच्या पाठिशी उभा आहे, असे एक बंडखोर आमदार म्हणाले होते. त्यांचा पवारांनी यावेळी समाचार घेतला. पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील काही आमदार हात पाय तोडण्याची भाषा करतात, अरे काय तुझ्या बापाच्या घरचे आहे काय, असे अजित पवार यावेळी संतापाने म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!
…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण
‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत
‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता