पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार???; अजित पवार म्हणतात…

पुणे : राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे, यावरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मी ही बातमी वृत्तपत्रात वाचली. यासंदर्भात उद्या पक्षाची बैठक आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीत कोणत्या त्रुटी राहिल्या ते बघून पक्ष त्या नोटीसीला उत्तर देईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाच्या या नोटीसीला 20 दिवसाच्या आत उत्तर न दिल्यास पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोग काढून घेऊ शकतो, असं नोटीसीमध्ये म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीसोबतच तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. त्यांनाही उत्तर देण्यास आयोगाने 20 दिवसांची मुदत दिली आहे.

1968 कायद्यानुसार, लोकसभेत पक्षाचे किमान 4 खासदार असावेत. त्या पक्षाला किमान 4 राज्यांच्या लोकसभा किंवा तिथल्या विधानसभा निवडणुकीत 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळायला हवीत.  किमान 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असायला हवी. या निकषांच्या आधारे निवडणूक आयोग एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.

सध्या राष्ट्रवादीकडे महाराष्ट्रात 4 तर लक्षद्विपची एक जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या जरी पुरेशी असली तरी इतर नियमांची पुर्तता करणं पक्षाला जमलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादी आता काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्वात मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही पण…

क्रिकेटपटूंच्या बायका आणि प्रेयसींचा खर्च किती?; ‘सीओए’नं तपशील मागवल्याने खळबळ

-घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्न सुटणार नाही; आढळरावांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

-अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला आढळराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणतात…

-मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे; आजीबाईंच्या एका शंकेनं बिंग फुटलं!

IMPIMP