‘यातले तर आमचेच तिकडं गेलेत’; अजित पवारांचा भाजपला टोला

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thakeray) विधानसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना विरोधकांना नामोहरण केलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या(Central Agencies) वापरामुळं राज्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच विरोधकांच्या सततच्या टीकेला आपल्या खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीशी संबंधितांवर सक्तवसूली संचनालयाकडून छापेमारी केली जात आहे. यावरून वाद वाढला आहे.

उद्धव ठाकरेंसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भाजपला सभागृहात चांगलंच धारेवर धरलं होतं. जास्त सह्या करण्याच्या प्रकरणावर अजित पवार चांगलेच संतापले होते.

धानाच्या संदर्भात मागण्यांचं एक निवेदन भाजपकडून देण्यात आलं होतं. त्यावर एकाच सदस्याच्या दोन सह्या असल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आल्यानंतर सभागृहात पवारांनी फटकेबाजी केली.

या यादीत ज्या आमदारांची नावं होती त्यातील 30-35 टक्के तर आमच्याकडूनच तुमच्याकडं गेलीत, असं सांगून अजित पवारांनी भाजपवर मिश्किल टीका केली आहे.

जे चुकलं ते चुकलं हे मान्य करा, डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न झालाय, असंही अजित पवारांनी भाजपला सुनावलं आहे.

दरम्यान, विधानसभेत विरोधकांवर टीका करताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनी विविध मुद्द्यांचा प्रभावी वापर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “जन्मल्यापासून आजपर्यंत मी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही”

 पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल ‘इतका’ पगार

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”