“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही”

नाशिक | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरेंनी सरकारला भोंग्याबाबत अल्टिमेटम दिला होता. 4  तारखेपर्यंत भोंगे उतरवण्यावर राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

लोकांच्या मनात जे विष कालवत आहेत त्यांनी एखादी संस्था, कारखाना उभा केला आहे का, संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

नाशिकमधील येवला येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर प्रतिहल्ला केला आहे.

पवार साहेब कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्याला  उत्तर देताना अजित पवारांनी राज ठाकरेंना धारेवर धरलं आहे.

फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेवून आपलं दुकान चालवणाऱ्यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत. त्यांचं जेवढं वय आहे तेवढं पवार साहेबांच काम आहे, असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

उत्तर प्रदेशातील उदाहरण देताना राज ठाकरेंनी तेथील परिस्थितीचा विचार करावा. त्याठिकाणी आता मंदीरांवरील देखील  भोंगे बंद करण्यात आले आहेत हे तुम्हाला चालेल का?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी सरकारला 4 तारखेचा अल्टिमेटम दिल्यानंतर अजित पवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही घेवू, असा इशारा राज ठाकरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना नवा आदेश, म्हणाले…

 “इथं कोणाची हुकुमशाही चालणार नाही, मग तो कोणीही असो”

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य 

“उद्धव ठाकरे होते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते” 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी