“चिखलीकर आणि मी काही दुष्मन नाही”

मुंबई : नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या भेटीत काही राजकीय अर्थ नाही. ते माझे चांगले मित्र आहे. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भाजपमध्ये आहे आणि मी राष्ट्रवादीत. त्यामुळे उगाच गैरसमज करु नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आज महाविकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी होणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, प्रतापराव चिखलीकर यांना मला कालच भेटायचं होतं. पण काल भेटणं शक्य झालं नाही. त्यामुळे मी त्यांना आज सकाळी लवकर या असं सांगितलं. त्यानुसार आमची ही भेट झाली. अनेक लोक वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटत असतात, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-