‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

पुणे | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पुन्हा दिसायला सुरु झाला आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी कठोर निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत.

यंदाच्या वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे 204 वा शौर्यदिन कार्यक्रम होतोय. यावेळी विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य केलं आहे.

काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे. शर्यती, सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करा, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे.

ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे.

मुंबईमध्ये गेल्या तीन (Mumbai corona cases) दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे.

मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण गुरुवारी बरे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा

गब्बर इज बॅक! रोहित शर्मा संघाबाहेर, ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार