मुंबई | जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने खळबळ माजवली. अशात राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह राज्य सरकारमधील सर्वांचं या परिस्थितीवर लक्ष आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये परदेशातून जे प्रवासी येतात त्यांच्यासंबंधी केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
बुस्टर डोसबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं लवकरात लवकर स्पष्ट करावा, बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचाय? आणि जर नाही द्यायचाय, तर का नाही द्यायचाय? याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या मार्च महिन्यात एक जोडपं दुबईहून राज्यात आलं. त्यानंतर त्यांना घरी सोडणाऱ्या ड्रायव्हरला कोरोना झाला आणि तो संपूर्ण राज्यभरात फोफावला. आताच्याही काळात देशातील वेगवेगळ्या राज्यांत एक-दोन असे रुग्ण आढळून आले होते. पण जिथे कुटुंबाला लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं, असं अजित पवार म्हणालेत.
अनेकजण सांगतात काळजी घ्या, मास्क वापरा याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. पण यासंदर्भात देशपातळीवर आरोग्य विभागानं आणि डब्ल्यूएचओनं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील काही राजकीय लोकांच्या घरात विवाह सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. हा ओमिक्रॉनचा विषाणू फार वेगााने पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. ओमिक्रॉनबाबत देशपातळीवर निर्णय झाल्यास राज्य सरकार देखील निर्णय घेईल, असं ते अजित पवार म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Omicron | ‘कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…’; धक्कादायक माहिती समोर
“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”
Omicron चे रुग्ण आढळल्यानंतर पुणे प्रशासन लागलं कामाला; घेतला हा निर्णय
साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक!