महाविकास आघाडी कायम राहणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

पुणे | महाविकास आघाडी कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर सगळे निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवरहीआघाडी बाबत ठरवायचे आहे. पक्षाच्या ताकतीनुसार समोरचे निर्णय घेतले जातील, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंय.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच शिंदे सरकारवर सडकून टीकाही केली.

मंत्री जर नेमले असते, तर राज्यातील 36 जिल्ह्यात काम सुरू झालं असतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही मालक असल्या सारखं वागत आहेत, असं मी म्हणतो मात्र ते स्वत:ला सेवक म्हणतात, असं अजित पवार म्हणालेत.

चाळीस जणांना सोबत घ्या. त्यांचाही सन्मान ठेवा. संपुर्ण निर्णय त्यांचा आहे. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना घालवलं. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मला तुम्ही तीस वर्षांपासून ओळखता, मी थोडं कडक वागतो पण कोणावर अन्याय करत नाही, असंही ते म्हणाले.

राज्यात तुफान पाऊस सुरु आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचं या पावसामुळं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत व्हायला हवी. मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर आपल्या क्षेत्रात सगळ्यांनी कामं सुरु केली असती, असं सांगत अजित पवारांनी सरकारवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर मी राजकारण सोडेन’; एकनाथ शिंदे यांचं ओपन चॅलेंज 

सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह 

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय बेकायदेशीर म्हणत एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा! 

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील” 

भगवी शाल आणि औक्षणासोबत फडणवीसांचं शिवतीर्थावर स्वागत, पाहा फोटो