“दादा बघा, दादा बघा… आता का बघा?, तर निवडणुका जवळ आल्या म्हणून”

पुणे | आता मान खाली घालून हसू नका. विरोधकांना मदत करणं बंद करा. आधी तसले धंदे बंद करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिकीट मिळण्याची सेटिंग लावण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांना सुनावलं आहे.

गट तट बाजूला ठेवा. विरोधकांना मदत करणं बंद करा. मला पिंपरी चिंचवड शहरातील खडानखडा माहिती आहे. आता खाली माना घालून हसू नका. आधी तसले धंदे बंद करा, असा सज्जड दमचं पवारांनी या कार्यकर्त्यांना भरला.

पिंपरी-चिंचवड: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याची सेटिंग लावण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कान टोचले आहेत. ते पुण्यात बोलत होते.

दादा बघा, दादा बघा… आता का बघा? तर निवडणुका जवळ आल्या म्हणून बघा. दादांचं माझ्याकडे लक्ष आहे का? हे आता बघतायेत. आता त्यांना चुकल्याचं कळतंय, असं फटकारतानाच पण ठीक आहे. मी सर्वांना सोबत घेऊनच पुढं जाणार आहे, असं अजित पवार म्हणालेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली भाजपची सत्ता उलथवून टाकणं हेच आपलं पहिलं ध्येय आहे. त्यामुळे यची असेल, तर एक-दोन पावलं मागे होऊयात. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी समन्वय साधावा लागेल, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवडध्ये कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊयात. पण शिवसेनेची इथं राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं, अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब 

जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल

10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख