बारामती | ज्यावेळी आम्ही आवाहन करतो त्यावेळी तुम्ही जो प्रतिसाद देता त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की अजून काम केलं पाहिजे. लवकर उठून सकाळी 6 वाजता केलं पाहिजे. अंधार असतो नाहीतर पहाटे 5 वाजता पण केलं असतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बारामतीमध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल, गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे.
बारामती एसटी बसस्थानाकाचे काम सुरू आहे ते राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकात असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल, असं ते म्हणालेत.
गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केली आहे.
काही जण निवडणुका जवळ आल्या की 50 वर्ष निवडून येतात, आणि पाण्याचं प्रश्न अजून मिटला नाही, असं म्हणत असतात. मात्र, निवडणुका गेल्या की कुठे गायब होतात तेच कळत नाही. मात्र, पाण्याचाही प्रश्न आता मिटवला आहे, त्यांच्याकडे आता मुद्दा ठेवला नाही, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक त्याचं श्रेय घेतात”
“सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही, सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारणार?”
‘राजकारणात जो आपला विरोध करतो तो ही उद्या…’; राज्यपालांचं मोठं वक्तव्य
“त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो”
धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ