महाराष्ट्र मुंबई

…नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या दिलखुलास भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मुंबईच्या घरी जागा कमी असल्याने बारामतीवरुन आलेल्या लोकांना बसवण्यास अडचण येते. कधी कार्यकर्त्यांना माझ्या बेडरुममध्ये बसवण्याची वेळ आली तर बायको मला घराबाहेर काढेल, असं पवार मिश्किलपणे म्हणाले. यावर एकच हशा पिकला. ते एका सभेत बोलत होते.

बारामतीतले लोक जेव्हा मुंबईला येतात, तेव्हा मी थोडा नाराज होतो. मुंबईतील माझं घर लहान आहे. त्यामुळे तिथे बसायला जागा नाही. आलेली लोकं हाॅलमध्ये बसवावी लागतात, तिथे गर्दी झाली की डायनिंगमध्ये बसावं लागतं. तिथेही गर्दी झाली की जयच्या बेडरुममध्ये बसावं लागतं. आता फक्त माझ्या बेडरुममध्ये बसवायचं बाकी आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर मला बायको हाकलून देईल, असं अजित पवारांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांनी थोडं दमांनं घ्यावं, दोन-चार दिवसात देवगिरी बंगला रिकामा होणार आहे. 100 दिवस काय केलं बाबानं कुणास ठाकून पण असून घर खाली केलं नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोलाही लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सुधीर मुनगंटीवर यांनी अद्याप बंगला रिकामा केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाण रंगले प्रेमरंगात; ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गायलं गाणं

-शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा

-शंकररावांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप विलासराव देशमुखांनी केलं होतं- अशोक चव्हाण

-पवारसाहेबांकडे पाहिल्यावर वाटतं… यांच्यासारखं काम करता यायला पाहिजे- अशोक चव्हाण

-“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”