अजित पवारांचा सल्ला एैकताच सभेत हास्यकल्लोळ

पुणे | विधानसभेतील विजय आणि उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली. या सत्कारानंतर अजित पवारांनी बारामतीकरांसमोर दमदार भाषण केलं.

अजित पवारांनी यावेळी बारामतीकरांना मुंबईत न येण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत होणारं काम असेल तरच या. सहज भेटालया येऊ नका. अजून सरकारी घर मिळालं नाही. मुंबईमध्ये छोटी घरं असतात, त्यामुळे आलेल्या लोकांना किचन, डायनिंग, बेडरुममध्ये बसवावं लागतं, असं पवार म्हणाले आहेत.

कोणीतरी येतो आणि म्हणतो सहज आलो आहे मुंबईला, असं करु नका. मुंबईला येताना मुंबईची कामं घेऊन या, सहज भेटायला येऊ नका. पत्नी सुनेत्रा तर मुंबईहून निघून आल्या. जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत येणार नाही म्हणाल्या, असं अजित पवार म्हणताच सभेत हास्यकल्लोळ झाला.

दरम्यान, अजित पवारांनी सभेत बोलताना बारामतीकरांचे आभार मानले आहेत. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-