सिंधुदुर्ग | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणेंना टोला लगावला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असं म्हणत अजित पवारांना नारायण राणेंना टोला लगावला आहे.
सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी राणेंवर बोचरी टीका केली आहे.
शिवराम भाऊ, डी.बी.ढोलम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते, असंही अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे असून येथे स्पर्धा मोठी असल्याचं अजित पवार म्हणाले. तसेच विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. दादागिरी दहशतीला घाबरू नका, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
योग्य व्यक्तीच्या हातात बँक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल. तसेच गाफिल राहु नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.
केंद्र सरकारची राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केलं पाहिजे, असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकायची आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
शिवराम भाऊंनी केलेलं काम प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल याचा मला विश्वास आहे, असं सतेज पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”
…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी
‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल’; चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान
रणबीर कपूर हा अजिबात सेक्सी मुलगा नाही, तो आईच्या…- सोनम कपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2021 मधील शेवटची ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष