राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय हालचालींना वेग आला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

अजित पवारांनी काल कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. तर माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं अजित पवार म्हणाले.

सर्वांच्या आशीर्वादाने मी कोरोनाला लवकरच हरवेल. तसेच मी लवकर कामाला सुरू होईल, असंही अजित पवार म्हणाले.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या. तसेच लक्षणं दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्या, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीचा सातवा दिवस आहे. एकिकडे राजकीय घडामोंडींवरून राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये, शिंदे गटानं काढला पाठिंबा

‘आमचं बाळ… लवकरच येणार’, आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे न्यायालयात बाजू मांडणार; एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क