पुणे महाराष्ट्र

…म्हणून शरद पवारांच्या घराबाहेर अजित पवारांचं ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेर मराठा आंंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनात चक्क शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सहभाग घेतला. मराठा आंदोलकांसोबत अजित पवार आंदोलनात बसले होते.

मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत घोषणा दिल्या.

दरम्यान, मराठा आंदोलकांनी बारामतीत शांततेत आंदोलन केलं आहे. मात्र आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. चक्क अजित पवार