मुंबई | मागील दोन वर्षापासून कोरोनाने (Corona) थैमान घातल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे सरकारने काही गाईडलाईन्स आखल्या होत्या. अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
केंद्र सरकारने देखील काही दिवसांपासून अनेक निर्बंध काढून टाकले आहे. फक्त मास्क आणि सामाजिक अंतर पाळणं बंधकारक ठेवण्यात आलं आहे.
केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रात देखील पूर्णपणे निर्बंध काढून टाकणार का?, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.
आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा चर्चिला जाणार आहे. त्यावर चर्चा करून निर्णय आजच्या बैठकीत होणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
उद्यापासून नविन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा निर्बंधमुक्त साजरा होण्यावर देखील सरकारचा भर असल्याचं दिसतंय.
एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यावर देखील अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे. अनिल परब या खात्याचे मंत्री आहेत. मागेच सांगितलं होतं की, 31 मार्चपर्यंत सर्वांना संधी द्या, असं पवार म्हणाले.
दरम्यान, तशी संधी सर्वांना देण्यात आली आहे. त्या मुळे उद्यापासून यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”
आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!