मुंबई| माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता बदल्यांचे रॅकेटबाबत भाष्य केले.
कायदा व सुव्यवस्थेला किंवा पोलीस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल. जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
जी वस्तुस्थिती आहे, जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचं कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत, असं अजित पवारांनी म्हटलंय.
“पोलीस बदल्यांचं रॅकेट आहे असं बोललं जात आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्याच्यात नावं आहेत. यादी आहे त्या यादीत नावं टाकली त्यांच्या बदल्या झाल्या का? त्यांची कागदपत्रे दाखवू का?” अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिलीय त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी आज प्रशासनात काम करत नाही. गेली 30 वर्षे प्रशासन सांभाळत आहे. असे सांगतानाच ज्यांच्याकडे कुठलंही महत्त्वाचं पद नाही अशा पध्दतीने कुणाबद्दलही येत आहे. त्यांचीही चौकशी करु, असं अजित पवारांनी सांगितलं.
विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, आरोप केला तरी राज्यसरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतही तथ्य नाही. असं म्हणत राज्यातली कायदा सुव्यवस्था आबादित आहे, असंही पवारांनी म्हटलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वाझे प्रकरणाबाबत मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. एटीएसतर्फे या घटनेचा तपास सुरू होता. आता पुढील तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. सत्य जनतेपुढे मांडले जाईल व जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आता ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’…
अळूची पाने खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या…