मुंबई | विलीनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून सपं पुकारला आहे. यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला.
गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. तरीही विलीणीकरणाचा तिढा संपायचं नाव घेईना.
अद्यापही काही कर्मचारी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन ठाम असल्याचं दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी संप मोडून सेवेत रूजू झाले आहेत. मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे आणि संप करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा आवाहन करुनही ते एकायला तयार नाहीत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मी सांगितलं तुम्हाला पगार चांगला देण्याचा आपण प्रयत्न करू, आमच्या मुलाबाळांना शाळेत जाताना अडचणी येत आहेत, त्यांना गिरणी कामगारांचे उदाहरण मी दिलंय, त्यांचा पगार वेळेत याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असं अजित पवार म्हणाले.
कुणी काही सांगत असेल त्याकडे लक्ष देऊ नका, कुणी वेगळ्या प्रवाहात जात असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणूया, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी पुन्हा आवाहन केलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंना अक्कलदाढ उशीरानं आली – संजय राऊत
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
Skin Care | उन्हाळ्यात दह्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!
इम्रान खान यांच्यानंतर पुढचा पंतप्रधान कसा निवडला जाईल?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया