पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे | पुण्यातील शाळा (Pune school ) मंगळवार 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केलं जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसं करायचं शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात 86 टक्के 15ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे.

पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे 

श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल 

पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये 

तरुणांसाठी मोठी बातमी; पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती 

“राज्यपालांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावं”