मुंबई | मागील काही दिवसांपासून सातत्याने ओमिक्राॅन (Omicron) रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. ओमिक्राॅनच्या वाढल्या धोक्यामुळे आता केंद्र सरकार सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय. (Ajit Pawar’s big statement on booster dose)
ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर आता अनेक राज्यामध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात देखील ओमिक्राॅनचा धोका सात्त्याने वाढत असल्याने राज्यात रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार देखील अॅक्शन मोड दिसत आहे.
अशातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करताना दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 15 ते 18 वयातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं होतं.
तसेच बुस्टर डोसला देखील परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्यातील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी आणि फ्रंट लाईन वर्क्ससाठी बुस्टर डोस देण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा पुर्णपणे तयार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
भविष्यात असं काही घडू नये, पण असं काही घडलं तर मुख्यमंत्री महोद्यांनी यंत्रणांना आदेश दिले आहेत. येत्.या काळात लागेल त्यापैक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार ठेवण्याचे आदेश दिल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत देखील वक्तव्य केलं आहे. कोणत्या फाइलवर सही करायची, हा सर्वस्वी अधिकार राज्यपालांना असतो, असं अजित पवार म्हणाले.
लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांचे पालन राज्यकर्ते करतील, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप
‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”
…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी
‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल’; चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान