पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

पुणे| गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. अशातच पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी परिस्थिती गंभीर होत चालली असून ती सुधारली नाही तर कठोर निर्णय घेणार, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना 2 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या 2 एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पुण्यात तब्बल 3 हजार 286 नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा 2 लाख 47 हजार 629 पर्यंत पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी दिवभरात 1 हजार 865 नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 26 हजार 936 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण….’…

“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं…

‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल…

‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’;…

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही…