“जन्मल्यापासून आजपर्यंत मी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही”

मुंबई | महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Goverment) काही दिवसांपूर्वी राज्यात वाईन विक्रीला परवानगी दिली होती. त्यांनतर राज्य सरकारवर बरीच टीका देखील झाली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचं आर्थिक धोरण सांगत असताना वाईन विक्रीच्या निर्णयावर देखील भाष्य केलं आहे.

विरोधकांकडून वाईन विक्रीच्या निर्णयावर केल्या जात असलेल्या टीकेला अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. परिणामी राज्यात अजित पवारांच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.

मद्यविक्रीवरील कर 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर कमी केल्यापासून राज्य सरकारला फायदा झाला आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

जे लोक दिल्लीला जायचे ते हातात 4-4 बाटल्या घेऊन यायचे. कारण तिथं कर कमी आहे. घेणारा घेतच असतो, असं पवार म्हणाले आहेत.

कर कमी केल्यापासून उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 100 कोटींवरून सरकारचा महसूल 300 कोटींवर आला आहे, असं पवार म्हणाले आहेत.

ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशीपासून मी दारूच्या एका थेंबाला मी स्पर्श केला नाही, हे सर्वांना माहिती आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचार करावा लागतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारवर भाजपकडून वाईन विक्रीवरून जोरदार टीका करण्यात येत होती. विधिमंडळ अधिवेशनात देखील वाईन विक्रीचा मुद्दा प्रचंड गाजला.

महत्त्वाच्या बातम्या – 

 पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल ‘इतका’ पगार

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…