शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार सु़डाचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट दिल्लीतून सुत्र हालवण्यास सुरूवात केली आहे.

शरद पवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 25 मिनीटं खलबतं झाली. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे आता राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मी सध्या शिर्डीत आहे. जोपर्यंत यावर माहिती येत नाही तोपर्यंत यावर काही बोलणं उचित राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दोन्ही मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांची विकासकामांवर देखील चर्चा झाली असणार, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली असणार यात काही शंकाच नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुचक संकेत दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दोन्ही बाजूने देण्यात आली नाही. मात्र, भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला साॅफ्ट काॅर्नर दिला आहे. अशातच आता आज चार वाजता पवार पत्रकार परिषदेत काय बोलणार?, याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर पवारांची औलाद सांगणार नाही”, अजितदादांनी दंड थोपटले

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट