पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील साखर संकुल येथे साखर महासंघाची बैठक पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी अजित पवारांकडे एक तक्रार आली. त्यावर त्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना फोन लावत सुनावल्याचं पहायला मिळालं.
सूचना दिल्यानंतरही अंमलबजावणी न केल्याने अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. काम झालेले नाही. मी तुम्हाला व्हॉट्सअॅप करतो. त्या व्यक्तीने हलगर्जीपणा केलाय त्याला जाब विचारा, असं अजित पवार म्हणाले.
सरकार म्हणजे अजित पवार ना, सरकार म्हणजे वर्षा नायर ना…?, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं.
माझ्या माहितीप्रमाणे कोणत्या तिसऱ्या व्यक्तीची तुमच्या विभागात नेमणूक केलेली नाही, असंही अजित पवार अधिकाऱ्याला म्हणाले. मला ते काम करुन हवंय, हे मी तुम्हाला सांगतोय, अशा सुचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीला उपस्थिती लावली.
पाहा व्हिडीओ-
सरकार म्हणजे अजित पवार ना…?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले! pic.twitter.com/6GJEDN2umZ
— पवन🇮🇳 (@ThePawanUpdates) March 5, 2022
महत्वाच्या बातम्या –
“काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना पुणे मेट्रोतून फिरुन आले”
व्लादिमीर पुतिन यांना घरचा आहेर; आता रशियन नागरिकांनी उचललं मोठं पाऊल!
“महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही”
“हे माझ्यासाठी नाही, मला वरपर्यंत द्यावं लागतं”; महिला इन्स्पेक्टरला अटक
“…म्हणून भारताने रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण