पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांची विधानसभेत टोलेबाजी, म्हणाले…

मुंबई | शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटल्यानंतर अखेर शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आजही राज्यात चर्चा सुरू असते. (Ajit Pawar’s commentary on the morning swearing in ceremony)

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती.

शरद पवारांनी आमदार भाजपकडे वळू न दिल्याने भाजप अल्पमतात आली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या घटनेवरून वारंवार चर्चा होताना दिसते.

अशातच या पहाटेच्या शपथविधीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावर आता अजित पवारांनी विधानसेभेत मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुनगंटीवारांना लगेच ती पहाट आठवते. त्यांना एक कळत नाही की त्या दिवशी पहाट नव्हती तर सकाळचे आठ वाजले होते, असं अजित पवार म्हणाले आहेत.

आता सकाळच्या आठला पहाट म्हणतात हे दुर्दैवी आहे, असं देखील अजित पवार म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांसमोर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

पहाटेच्या शपथविधीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी विधानसभेत या घटनेचा उल्लेख केला आहे. मी पुन्हा येईल, असा ठामपणे फडणवीसांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर फासे पटल्याचं दिसून आलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

“2 वर्ष झोपा काढल्या का? मी सरकारला पुन्हा एकदा सांगतोय…”

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”