राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य- अजित पवार

पुणे | महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी ते बोलत होते.

आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मग ती कोणत्याही माध्यमाची असो आम्ही तिथे मराठी भाषा दहाविपर्यंत अनिवार्य करणार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

पोलिसांना चांगल्याप्रकारचं घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात काम करता आलं नाही. शहरासोबत जिल्ह्याची जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलं आहे. आता आपलं काम आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-